राष्ट्रवादीचे मोहन नवले धुळ्याचे नवे महापौर

January 1, 2009 7:26 AM0 commentsViews: 9

1 जानेवारी 2009 धुळेराष्ट्रवादीचे मोहन नवले यांची धुळे महानगरपालिकेचे महापौर म्हणून निवड झाली. असं असलं तरी काँग्रेसचा बालेकिल्ला समजली जाणारी धुळे जिल्हा परिषद शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात गेली आहे. धुळे जिल्ह्यात युतीचा भगवा फडकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ह्या निवडणुकीत युतीच्या जागा चौपटीनं वाढल्या आहेत. त्यामुळे सेना-भाजपचा हा विजय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी आगामी निवडणुकीत हा मोठा धोका ठरणार आहे.सर्वाधिक जागा मिळवणा-या राष्ट्रवादी काँग्रेसनं धुळे महापालिकेचं महापौरपद आपल्या ताब्यात मिळवलंय. धुळे दंगलीतले आरोपी आणि महापालिकेत निवडून आलेले साबीर शेख यांनी यावेळी जामिनावर सुटून मतदान केलं. उपमहापौर पदाची माळ फजल उर रहमान अन्सारी यांच्या गळ्यात पडली. धुळे शहरात राष्ट्रवादीनं आपली सत्ता टिकवण्यात यश मिळवलं, पण जिल्ह्यात भगव्यानं मुसंडी मारली. काँग्रेसचा बालेकिल्ल्या समजल्या जाणा•या धुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच युतीची सत्ता आली. शिवसेनेचे सुधीर जाधव जिल्हा परिषदेच्याअध्यक्षपदी निवडून आले आहेत. जिल्ह्यातलं हे सत्ता परिवर्तन आगामी लोकसभा निवडणुकीची नांदी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. भाजप आ. जयकुमार रावल सांगतात, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे काँग्रेससाठी लोकसभेची झलक असतात. यावेळी सुरुवातीलाच त्यांचा पराभव झाला आहे ही आगामी राजकारणातल्या बदलाची नांदी आहे.मागच्या वेळी धुळे जिल्हा परिषदेत युतीच्या अवघ्या 6 जागा होत्या. त्यावेळी युतीनं तब्बल 23 जागांवर मुसंडी मारली आहे.

close