काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात ठाणे विभाजनाचा मुहूर्त टळणार

April 27, 2013 12:13 PM0 commentsViews: 98

27 एप्रिल

ठाणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात ठाण्याच्या विभाजनाचा 1 मेचा मुहूर्त टळणार आहे. ठाण्याचं विभाजन करून नवा पालघर जिल्हा करण्याचा प्रस्ताव आहे. पण ठाणे जिल्ह्याचं विभाजन केल्यावर तिथलं राष्ट्रवादीचं वर्चस्व कमी होईल. तसंच नव्या पालघर जिल्हा आणि त्यातले 1 लोकसभा आणि 6 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या अधिपत्याखाली येतील, अशी भीती राष्ट्रवादीला वाटतेय.

ठाणे जिल्ह्याचं विभाजन करुन नवा पालघर जिल्हा करण्याचा प्रस्ताव महसूल खात्यानं तयार केला होता. हा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त आणि नियोजन खात्याकडे पाठवला होता. पालघर जिल्ह्याची निर्मिती करायची असेल तर सरकारी इमारती आणि इतर कामांसाठी पाचशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वित्त आणि नियोजन खात्यानं हरकत घेतल्यानं ठाणे जिल्ह्याच्या विभाजनचा 1 मे चा मुहूर्त टळणार आहे हे स्पष्ट झालंय. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 1 मेला ठाणे जिलह्याचं विभाजन होईल अस जाहीर केलं होतं पण त्यामुळे निवडणूकांपूर्वी ठाणे जिल्हायचं विभाजन शक्यतोवर टाळायचं अशी भूमिका राष्ट्रवादी काँगे्रसनं घेतलीय.

close