म्हाडाच्या घरांसाठी 1 मेपासून ऑनलाईन अर्ज

April 27, 2013 5:42 PM0 commentsViews: 33

27 एप्रिल

मुंबई : मुंबईत घरं घेण्याचं स्वप्न पाहणार्‍यांना म्हाडानं यंदा चांगलाच झटका दिला आहे. म्हाडाची घरं चांगलीच महागली आहे. म्हाडाच्या 1 हजार 259 घरांसाठी सोडत निघणार आहे. एक मेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात होणार आहे. अर्ज फी 100 रुपये असणार आहे. हे अर्ज 21 मे पर्यंत भरता येणार आहेत. यावर्षीच्या घरांच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी सुमारे साडेसहा लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत घरांच्या किमती असणार आहेत. मुंबईत तुंगा गाव पवई, पवई एमएचपी, मालवणी मालाड, चारकोप, शिंपोली बोरिवली, मागाठणे बोरीवली, शैलेंद्रनगर दहिसर, प्रतीक्षा नगर सायन, विनोबा भावे नगर कुर्ला, आणि तुर्भे मंडाले याठिकाणी ही घरं असणार आहेत. म्हाडाची घरं खासगी बिल्डरांच्या बरोबरीनं महाग होत असल्यानं सर्वसामान्य नागरिंकांमध्ये नाराजी आहे.

close