आसाममधल्या 3 स्फोटात 5 ठार 51 जखमी

January 1, 2009 2:38 PM0 commentsViews: 2

1 जानेवारी 2009 आसामआसामामध्ये 3 स्फोट झाले आहेत. हे स्फोट आसाममधील गुवाहाती इथल्या बिरुवाडी, भूतनाथ आणि बीग बाजर याठिकाणी झाले आहेत. हे स्फोट कमी तीव्रतेचे असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्फोटात 5 ठार आणि 51 जण जखमी झाले आहेत. जखमींना गुवाहाती इथल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.पहिला स्फोट बिरुवाडी इथे झाला असून दुसरा स्फोट भूतनाथमध्ये झाला.तिसरा स्फोट बीग बाजर येथे झाला. ही स्फोटकं सायकलवर ठेवण्यात आली होती. या स्फोटात उल्फा अतिरेक्यांचा हात असल्याचं आसामचे डीजीपी जी.एम. श्रीवास्तव यांनी म्हटलंय.या आधी 30 ऑक्टोबरमध्ये झालेल्या 12 स्फोटात 20 ठार आणि 200हून अधिक जखमी झाले होते. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे आज गुवाहाटी भेटीवर आहेत. ते शहरात पोहोचण्यापूर्वी हे स्फोट झाले.

close