जळगावात 147सोनोग्राफी सेंटर्सवर धाडी टाकण्यात आल्या

January 1, 2009 10:00 AM0 commentsViews: 4

1 जानेवारी 2009 जळगावजळगांव जिल्ह्यांतील 147 सोनोग्राफी आणि पीएनडीटी सेंटरवर जिल्हाधिका-यांनी धाडी टाकल्या. या धाड सत्रात, संपूर्ण जिल्ह्यांत एकाचवेळी 16 पथकांनी कारवाई केली. ही संयुक्त कारवाई जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांनी केली. जळगांव जिल्ह्यांत मुली जन्माला येण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे असं अहवालवरून दिसून आलं याच कारणावरून ह्या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. या अहवालात प्रति हजारी 120 ची तूट नमूद करण्यात आली आहे. ही चिंताजनक बाब असल्यामुळेच जळगांव जिल्ह्यांत हे धाडसत्र सरकारनं सुरू केल्याचं सांगण्यात आलं आहे. स्वत: जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन याधाडीचं नेतृत्व करत आहेत.या धाडीत अनेक प्रतिष्ठित डॉक्टरांकडे आक्षेपार्ह बाबी आढळल्यानं त्यांचे रेकॉर्ड जप्त केले गेले आहेत.

close