शीखविरोधी दंगलीप्रकरणी सज्जन कुमार निर्दोष

April 30, 2013 12:55 PM0 commentsViews: 6

30 एप्रिल

नवी दिल्ली : 1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दिल्ली कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहेत. दिल्ली कॅन्टोनमेंट भागात शिखांविरोधात जमावाला भडकवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याशिवाय इतर पाच आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. दरम्यान, कोर्टाच्या निकालामुळे शिख समुदायामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांनी कोर्टाबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसंच निकाल सुनावल्यानंतर भडकलेल्या एका व्यक्तीने न्यायमूतीर्ंच्या दिशेने बूटही भिरकावला.

close