प्राध्यापकांच्या संपात फूट

May 1, 2013 9:25 AM0 commentsViews: 16

01 मे 2013

कोल्हापूर : गेल्या 86 दिवसांपासून सुरू असलेल्या प्राध्यापकांचा संपात आणखी फूट पडली आहेत. कोल्हापुरातील 1 हजार 258 प्राध्यापक आंदोलनातून बाहेर पडले आहेत. शिवाजी विद्यापीठातल्या 1,258 प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासायला तयारी दाखवली आहे त्यांनी तसं पत्र विभागीय शिक्षण सहसंचालकांना दिलं आहे.

राज्यसरकारने कारवाईची छडी उगारताच प्राध्यापकांनी एक धावाधाव सुरू केली. गेल्या दोन दिवसात 315 प्राध्यापक तर त्यापूर्वीच 392 प्राध्यापक संपातून बाहेर पडलेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1 हजार 965 प्राध्यापक संपातून बाहेर पडले आहे. दरम्यान, संपकरी प्राध्यापकांनी संप मागे घेतला नाही, तर विद्यापीठ अधिनियम 1984 कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी घेतली. ही कारवाई करावी, असेआदेश कुलपती म्हणजेच राज्यपांलांनी कुलगुरूंना दिल्याची माहितीही टोपेंनी दिली.

या संपामुळे 20 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे हे प्राध्यापकांना शोभत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. प्राध्यापकांना द्यायची साडेसात हजार कोटी रूपयांची थकबाकी वितरित करण्याचा निर्णय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ, असं आश्वासनही टोपे यांनी दिलं. पण ही कारवाई होणार असेल तरी, प्राध्यापकांना 'मेस्मा' लावणार नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन-लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत म्हटलं होतं.

close