वाशिममध्ये अपघातात लाचलुचपत खात्याचे 6 कर्मचारी ठार

May 1, 2013 9:46 AM0 commentsViews: 42

01 मे

वाशिम जिल्हयात कमरगा इथं राज्य मार्ग 199 वर पोलिसांच्या गाडीला झालेल्या अपघात अँटी करप्शन ब्युरोचे सहा कर्मचारी ठार झालेत. या अपघातात दोन पी.आय. तर चार कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. तर तीन जण गंभीर जखमी झालेत. वाशिममध्ये छापा घातल्यानंतर एसीबीचे कर्मचारी अमरावतीला परतत होते. सकाळी सहाच्या दरम्यानं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही गाडी एका झाडावर आदळली. जखमींना अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

close