सरबजीतच्या बहिणीचा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

May 1, 2013 11:15 AM0 commentsViews: 15

01 मे

पाकिस्तानाच्या तुरूंगात प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सरबजीत सिंग यांची प्रकृती खालावली आहे. त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्याचे कुटुंबीय पाकिस्तानात गेले होते. आज दुपारी त्याचेे कुटुंबीय भारतात परतलेत. त्यांनी पाकिस्तानात सरबजीतला मिळणार्‍या वैद्यकीय उपचारांवर नाराजी व्यक्त केली. सरबजीत भारतात येईपर्यंत आपण अन्नत्याग आंदोलन करणार अशी घोषणा त्यांची बहिण दलबीर कौर यांनी केलीय. सरबजीत यांच्या कुटुंबीयांनी युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही भेट लवकरच होईल असं दलबीर कौर यांनी सांगितलंय.दरम्यान, सरबजीत कायमस्वरूपी कोममध्ये गेले आहेत. ते वाचण्याची आशा पूर्णतः मावळली आहे अशी दुखद माहितीही कौर यांनी दिली.

close