बीड जिल्ह्यातील अपघातात 10 ठार तर 20जण जखमी

January 1, 2009 1:15 PM0 commentsViews: 16

1 जानेवारी 2009 बीडबीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिरापूरजवळ ट्रक आणि जीप यांच्यात टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातात 10 ठार तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना बीडमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सोलापूर-औरंगाबाद रस्त्यावर हा अपघात झाला. बीडपासून हिरापूर हे ठिकाण 30ते35 कि.मी. आहे. त्यामुळे त्याठिकाणहून 15 कि.मीवर असलेल्या देवराई इथे उपचार करण्यात आले. या जीपमधले प्रवासी बीडमधल्या जामखेड, शिरूर तालुक्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

close