एकनाथ खडसेंच्या मुलाची आत्महत्या

May 1, 2013 1:11 PM0 commentsViews: 110

01 मे

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ते 35 वर्षांचे होते. आज दुपारी त्यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून घेतली. यावेळी घरात कोणीही नव्हतं. गोळी झाडल्याचा आवाज झाल्यामुळे त्यांच्या आईनी घरात जाऊन पाहिले असता निखिल खडसे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना तातडीने उल्हास पाटील मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

निखिल खडसे हे गेल्या काही दिवसांपासून असाध्य आजारांनी त्रस्त होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण निखिल खडसे यांनी आत्महत्या का केली याची माहिती अजून कळू शकली नाही. निखिल खडसे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधान सभेची निवडणूक लढवली होती मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. निखिल खडसे यांच्या आत्महत्येची बातमी वार्‍यासारखी पसरली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल बाहेर एकच गर्दी केलीय. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी मुक्ताईनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येईल.

कोण होते निखिल खडसे

- विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंचा एकलुता एक मुलगा निखिल खडसे – (वय 34 वर्षं)- जळगाव जिल्हा परिषद सदस्य होते निखिल खडसे- गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्यानं तणावग्रस्त- निखिल खडसेंच्या पत्नी रक्षा खडसे या जळगाव शिक्षण आरोग्य सभापती आहेत.- निखिल खडसेनां एक मुलगा आणि मुलगी.. मुलगी साडेपाच वर्षाची कृषिका आणि मुलगा पावणेदोन वर्षाचा गुरुनाथ

close