बंदी घातलेल्या जमात-उद-दावाच्या कारवाया अजूनही सुरूच

January 1, 2009 4:41 PM0 commentsViews: 2

1 जानेवारी 2009मुंबई हल्ल्यानंतर लष्कर-ए-तोयबाची बंदी घातलेली संघटना जमात-उद-दावाच्या कारवाया अजूनही सुरू आहेत. ही माहिती परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी दिली आहे. ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.जमात-उद-दावा आता तहरीक-इ-हरमत-रसूल या नव्या नावानं काम करत आहे असं त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रानं बंदी घातल्यानंतर दोनच आठवड्यात या संघटनेचं काम पुन्हा सुरू झाल्याचं ते म्हणाले. दहशतवादासाठी निधी जमा करण्याच्या उद्देशानं जमातनं एक नवी वेबसाईटही सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.मुंबई हल्ल्याचा संयुक्त तपास करण्याचा पाकिस्तानचा प्रस्तावही मेनन यांनी फेटाळून लावला. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई हल्ल्याचे अनेकदा पुरावे पाकिस्तानला दिले आहेत. पण त्याचा अजून काहीच परिणाम झाला नाही. भारत आणि पाकिस्तानदरम्यान स्थापन झालेल्या दहशतवादविरोधी संयुक्त यंत्रणेचाही काहीच उपयोग झाला नाही, अशी कबुलीही यावेळी परराष्ट्र सचिव मेनन यांनी दिली.

close