नागपुरात 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

May 1, 2013 4:20 PM0 commentsViews: 3

01 मे

नागपूर : लग्नसमारंभात आलेल्या एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर घरगड्यानं अत्याचार केल्याची घटना नागपूरमध्य घडली. नागपूरजवळच्या गोसावी मांगली गावात ही घटना घडली.या प्रकरणी आरोपी सुरेश खेडकरला अटक करण्यात आली आहे.

पूर्व नागपूरमध्ये राहणारं एक कुटुंब गावात लग्नासाठी आलं होतं. लग्नाच्या तयारीत लोक असतांना या कुटुंबातील तीन वर्षांची मुलगी घराच्या परिसरात खेळत होती. याच घरात नोकर असलेला आरोपी सुरेश खेडकर याने या मुलीला पाचशे मीटर अंतरावरील नाल्याजवळ नेवून तिच्यावर अत्याचार केला. या मुलीला या नाल्याच्या परिसरातील तणसाच्या ढिगार्‍याखाली मुलीला फेकून दिलं.

दुसर्‍या दिवशी गावकर्‍यांना ही मुलगी नाल्याजवळ सापडली. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या नंतर घटनेची माहिती कुंटुबीयांना देण्यात आली. पोलिसांना गावात विचारपूस केल्यावर त्यांना नोकर सुरेश खेडकरवर संशय आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा त्याने आपण हे कृत्य दारुच्या नशेत केल्याची कबूली दिली. मुलीला उपचारासाठी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

close