पाकिस्तानने विश्वासघात केला !

May 2, 2013 7:46 AM0 commentsViews: 22

02 मे 2013

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कैदेत असलेला भारतीय कैदी सरबजीत सिंग यांचा काल रात्री 1 वाजता लाहोरच्या जिना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह आज संध्याकाळी भारतात परत आणणार आहेत. यांच्या मृत्यूनंतर भारतामध्ये संतापाची लाट उसळलीये. सरबजीतचा मृत्यू ही हत्या असल्याचा आरोप सरबजीतची बहिण दलबीर कौर यांनी केलाय. पाकिस्ताननं भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांच्यावर हल्ला करण्याची मागणीही त्यांनी केली. भाजपने केंद्र सरकारवर टीका केलीये. तर यामुळे भारत-पाक संबंधांवर परिणाम होईल, असं परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलंय. सरबजीत सिंग यांचा काल रात्री एक वाजता मृत्यू झालाय. 26 एप्रिलला लाहोरमधल्या कोट लखपत तुरुंगात काही कैद्यांनी सरबजीत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत जिना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर गेले सहा दिवस सरबजीत मृत्युशी लढत होते. मंगळवारी त्यांचा ब्रेनडेड झाला होता. सरबजीत यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी हलवण्यात आलाय.सरबजीतचं कुटुंबिय कालच भारतात परतलं होतं. सरबजीतच्या मृत्युबाबत पंतप्रधानांनी शोक व्यक्त केलाय.वाचण्याची आशा मावळल्यानंतर सरबजीत यांचं व्हेेटीलेटर काढून घेण्यात आलं. मात्र कोणाच्या परवानगीनं त्यांचं व्हेटींलेटर काढून घेण्यात आलं, हा प्रश्न उपस्थित झालाय.

close