वांद्र्यात तरूणीवर अ ॅसिड हल्ला

May 2, 2013 10:55 AM0 commentsViews: 8

02 मे

मुंबई : येथील गजबलेल्या बांद्रा टर्मिनसवर सकाळी आठच्या सुमारास एका 24 वर्षीय तरूणीवर अ ॅसिड हल्ला झालेली खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात तरूणीशिवाय आणखीही दोन जणी जखमी झाल्या आहेत. तरूणीची तब्येत गंभीर असून तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी कायमची जाण्याची भिती व्यक्त होतेय. सीसीटीव्हीमध्ये हल्ला करणारा स्पष्ट दिसत नाही. पण धागेदोरे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला. या मुलीचं कुटुंब सकाळी गरीब रथातून उतरलं. त्यावेळेस स्टेशनवर या मुलीवर अज्ञात व्यक्तीनं ऍसिड फेकलं. हे प्रमाण इतकं जास्त होतं की, या मुलीचा छातीचा, खांद्याचा भाग जळालाय. तसंच तिच्या त्वचेलाही गंभीर जखमा झाल्यात. या मुलींना भायखळ्याच्या मसिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

close