लाचखोर अधिकार्‍यांचा ‘हॉस्पिटल ड्रामा’, अटक लांबणीवर

May 2, 2013 11:02 AM0 commentsViews: 6

02 मे

नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाचखोर अधिकारी सतीश चिखलीकरला तिसरा दिवस उजाडला तरी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या मालमत्तेची मोजणी अद्याप सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामाचं बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडून 22 हजार रुपयांची लाच मागितली होती. कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या वतीनं शाखा अभियंता जगदिश वाघ यांना ही लाच स्वीकारताना ऍण्टी करप्शननं त्यांना पकडलं होतं. त्यांच्या घरांवर घातलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 2 कोटी 96 लाख रूपयांची मालमत्ता सापडली होती. विशेष म्हणजे, पायी चालण्याएवढे ते निरोगी दिसत असताना, त्यांना अत्यावस्थ म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची अटक लांबली आहे.

close