तहरीक-इ-हरमत-रसूल : जमात-उद-दावाचं दुसरं नाव

January 2, 2009 4:30 AM0 commentsViews: 2

2 जानेवारी, मुंबई मुंबई हल्ल्यानंतर लष्कर-ए-तोयबाची बंदी घातलेली संघटना जमात-उद-दावा च्या कारवाया अजूनही सुरूच आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी तशी माहिती दिली आहे. ऑल इंडिया रेडिओला शिवशंकर मेनन यांनी दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांनी तशी माहिती सांगितली आहे. ' जमात-उद-दावा ' ही अतिरेकी संघटना आता तहरीक- इ -हरमत -रसूल" या नव्या नावानं काम करतेय, असं त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रानं बंदी घातल्यानंतर दोनच आठवड्यात या संघटनेचं काम पुन्हा सुरू झाल्याचं ते म्हणाले. दहशतवादासाठी निधी जमा करण्याच्या उद्देशानं जमातनं एक नवी वेबसाईट सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई हल्ल्याचा संयुक्त तपास करण्याचा पाकिास्तानचा प्रस्तावही मेनन यांनी फेटाळून लावला. हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला अनेकदा दिलेत. पण त्याचा अजून काहीच परिणाम झाला नाही, असं ते म्हणाले..भारत आणि पाकिस्तानदरम्यान स्थापन झालेल्या दहशतवादविरोधी संयुक्त यंत्रणेचाही काहीच उपयोग झाला नाही, अशी कबुलीही परराष्ट्र सचिव मेनन यांनी दिली.

close