लाचखोर चिखलीकरांच्या लॉकरमध्ये सापडलं तब्बल 4 किलो सोनं

May 2, 2013 2:12 PM0 commentsViews: 19

02 मे

नाशिक: सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाचखोर अधिकार्‍यांना आज तिसर्‍या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्या मालमत्तेची मोजणी अजून सुरू आहे. लाचखोर अधिकारी सतीश चिखलीकरांच्या लॉकरमध्ये तब्बल 4 किलो सोनं आणि 1 कोटींची रोकड सापडली तर ब्रँच इंजिनिअर जगदीश वाघ यांच्या बँकेतल्या लॉकरमधून आत्ताच 15 लाखांची रोकड आणि 45 तोळं सोनं जप्त करण्यात आलंय.

याआधीही सतीश चिखलीकर यांच्या घरून 3 कोटी रुपयांची रोकड आणि कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रं हस्तगत करण्यात आली होती. रस्त्याच्या बांधकामाचे बील मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडून 6 टक्के या दरानं 22 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावेळी त्यांच्या घरांवर घातलेल्या छाप्यात कोट्यवधींची अवैध संपत्ती आढळून आली होती. दरम्यान, सतीश चिखलीकर यांच्या प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे, पायी चालण्याएवढे ते निरोगी दिसत असताना, त्यांना अत्यावस्थ म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

close