सैन्यदलाचा वेतन दर्जा सुधारणार

January 2, 2009 4:48 AM0 commentsViews: 1

2 जानेवारी, मुंबई सरकारनं सैन्यदलासाठी नव्या वर्षानिमित्त भेट दिली आहे. पंतप्रधान कार्यालयानं लष्करासाठी वेगळ्या पे कमिशनला मान्यता दिली आहे. याबाबतचे निर्देश पंतप्रधान कार्यालयानं संरक्षण मंत्रालयाला दिले आहेत. सनदी नोकरांपेक्षा आपल्याला वेगळी वागणूक मिळत असल्याची लष्करी अधिकार्‍यांची तक्रार होती. पण, या निर्णयामुळे आता त्यांना चांगले वेतन मिळणार आहे. लेफ्टनंट कर्नलबरोबरच त्या दर्जाच्या नेव्ही आणि हवाई दलाच्या अधिकार्‍यांना आता जास्त वेतन मिळणार आहे. सैन्य दलातल्या बारा हजार अधिकार्‍यांना याचा फायदा होईल. त्यांना आता महिन्याला जवळपास 10 हजार रुपये वाढवून मिळतील. अधिकारी दर्जाच्या खालच्या जवानांच्या पेन्शन फॉर्म्युल्यामध्येही सुधारणा करण्यात आलीय.. मात्र लेफ्टनंट जनरल पदाच्या अधिकार्‍यांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात येणार नाहीये.

close