रैनाने ठोकली पहिली सेंच्युरी

May 2, 2013 4:31 PM0 commentsViews: 32

02 मे

आयपीएलमध्ये आज तिसर्‍या सेंच्युरीची नोंद झाली आणि तीही एका भारतीय बॅट्समननं केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स नावावर असलेल्या सुरेश रैनानं आज शानदार सेंच्युरी ठोकली. चेन्नई सुपर किंग्जचा हुकमी बॅट्समन म्हणजे सुरेश रैना. आतापर्यंतच्या चेन्नईच्या यशात सुरेश रैनाचा वाटा सर्वात मोठा ठरला आहे. आणि यंदाच्या हंगामातही सुरेश रैना चांगलाच फॉर्मात आहे. याचीच झलक आज किंग्ज इलेव्हन विरुद्धच्या मॅचमध्ये पहायला मिळाली. तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या रैना सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत चेन्नईला मोठा स्कोर उभा करुन दिलाच, पण शानदार सेंच्युरीही ठोकली. आयपीएलमधली ही त्याची पहिलीच सेंच्युरी ठरलीय. रैनानं अवघ्या 53 बॉलमध्ये 7 फोर आणि 6 सिक्सची बरसात केली.

close