सरबजीतचा मृत्यू डोक्यात रॉड मारल्यामुळे !

May 2, 2013 5:03 PM0 commentsViews: 18

02 मे

लाहोर : गेले 6 दिवस पाकिस्तानातल्या हॉस्पिटलमध्ये असलेले भारतीय कैदी सरबजीत सिंग यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सरबजीतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा धक्कादायक खुलासा जिओ टीव्हीचे पत्रकार अहमद फराझ यांनी आयबीएन लोकमतकडे केला. सरबजीतच्या डोक्यात खूप जोरात रॉड मारण्यात आला होता तसंच त्याच्या डाव्या कानावर आणि डोळ्यावरही गंभीर जखमां होत्या अशी माहिती शवविच्छेदनात करण्यात आली आहे. डोक्यात रॉड मारल्यामुळेच सरबजीतचा मृत्यू झाला अशी माहिती अहमद फराझ यांनी आयबीएन लोकमतला दिली. पाकिस्तानात सरबजीतच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी सुरू झाली अशी माहितीही त्यांनी दिली.

लाहोरमधल्या जिना हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री एक वाजता सरबजीतचा मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव लाहोरहून विशेष विमानानं अमृसरमध्ये आणण्यात आलं. पंजाबमधल्या किकिविंड या त्यांच्या मूळगावी उद्या त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

पण सरबजीतचं पार्थिव भारतात जाऊ नये यासाठी पाकिस्तानातील काही अधिकार्‍यांनी अटकाव घातला. शवविच्छेदनानंतर त्याचं पार्थिव विमानतळावर नेण्यात आलं तेव्हा तिथेही ते थांबवण्यात आलं. तिथल्या कस्टम अधिकार्‍यांनी पार्थिव थांबवून त्याची तपासणी केली. पण भारतीय अधिकार्‍यांनी दबाव टाकल्यानंतर पाक सरकारने पार्थिव जाऊ द्यावे असे आदेश दिले.

एवढेच नाही तर ऍन्टी नार्को टेस्ट फोर्सने शव पेटीमध्ये हेरॉईन, कोकेन, अमली पदार्थ असतील म्हणून पार्थिव अडवून ठेवले होते. पुन्हा भारतीय अधिकार्‍यांनी दबाव टाकल्यानंतर सरबजीतचं पार्थिव इंडियन एअरलाईन्सच्या ताब्यात देण्यात आलं अशी धक्कादायक माहिती जिओ टीव्हीचे पत्रकार अहमद फराझ यांनी आयबीएन लोकमतला दिली. सरबजीतचा मृत्यू जोरात रॉड मारल्यामुळे झाला असा दावाही त्यांनी केला.

कोण होते सरबजीत !

close