प्रताप सरनाईकांचं अनधिकृत बांधकाम पाडा : कोर्ट

May 3, 2013 11:15 AM0 commentsViews: 16

03 मे

ठाणे : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करावी असे आदेश हाय कोर्टाने दिले आहेत. सरनाईक यांच्या छाबिया पार्क आणि विहंग अपार्टमेंट मधल्या बेकायदा बांधकामा विरोधातल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला. याबाबत कनिष्ठ न्यायालयाने फ्लॅटधारकांसाठी जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश कसा दिला असा सवालही हाय कोर्टाने केला.

शहरातील वर्तकनगरमधल्या छाबिया पार्कमध्ये 9 मजल्यांची परवानगी असताना 13 मजल्यांच्या दोन टॉवरचं बांधकाम करण्यात आलं होतं. ठाणे महापालिकेनं त्याबाबत सरनाईकांना नोटीसही बजावली होती. छाबिया मधल्या फ्लॅटधारकांनी न्यायालयात धाव घेत कारवाईला स्थगिती मिळवली. महापालिकेने त्या विरोधात हाय कोर्टात दाद मागितली होती, त्यावर न्यायालयाने हा आदेश देत कारवाईचे आदेश दिल्याने अवैध बांधकाम करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पण प्रताप सरनाईक यांनी सर्व आरोप नाकारले आहे.

सरनाईकांचा अनधिकृत बांधकामाचा 'प्रताप'

close