पाकिस्तानच्या कैद्याला जम्मूच्या तुरूंगात मारहाण

May 3, 2013 8:19 AM0 commentsViews: 3

03 मे

जम्मू : सरबजीत सिंगच्या मृत्यूचे पडसाद भारतातल्या तुरुंगांमध्येही उमटलेत. जम्मूमधल्या कोट लखवाल तुरुंगात कैद्यांमध्ये झालेल्या मारामारीत एक पाकिस्तानी कैदी जखमी झाला आहे. सनउल्ला हक असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर जम्मूमधल्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली. नंतर त्याला चंदिगढला हलवण्यात आलं. दरम्यान, पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयानं हा मुद्दा परराष्ट्र मंत्रालयाकडं उपस्थित केला. ही घटना, सनउल्लावर केले जात असलेले उपचार, अधिकार्‍यांना कैद्यांची भेट घेण्यास परवानगी तसंच इतर पाकिस्तानी कैद्यांची सुरक्षा हे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. दरम्यान, उत्तर प्रदेशातल्या तुरुंगांमधल्या पाकिस्तानी कैद्यांची सुरक्षा वाढवण्यात आलीये. त्यांना भारतीय कैद्यांपासून वेगळं करण्यात आली.

close