भैय्या देशमुखांच्या मागण्या रास्त -ढोबळे

May 3, 2013 1:00 PM0 commentsViews: 23

03 मे

मुबंई : गेल्या 90 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या भैय्या देशमुखांची आज पाणीपुरवढा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भेट घेतली. सर्व शक्यतांचा विचार करून सोलापूरसाठी पाणी सोडण्या निर्णय होईल असं आश्वासन ढोबळे यांनी दिलं. पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या भैय्या देशमुख यांची मागणी रास्त असून लवकरच आपण त्यांची भेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी घालून देऊ असं आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भैय्या देशमुखांना दिलंय. आझाद मैदानात सुरू असलेल्या भैय्या देशमुख यांच्या आंदोलनाचा आजचा 89 वा दिवस आहे. यावेळी ढोबळेंनी भैय्या देशमुखांना आंदोलन मागं घेण्याचंही आवाहन केलंय.

close