नागपुरात व्यापार्‍यांच्या आंदोलनात फूट

May 3, 2013 1:44 PM0 commentsViews: 5

03 मे

नागपूर : मागिल महिन्यापासून व्यापार्‍यांनी एलबीटीविरोधात राज्यभर आंदोलन पुकारले आहे मात्र आता या आंदोलनात फूट पडली आहे. शहरातील सीताबर्डी मेनरोडवरील कापड व्यावसायिकांनी एलबीटी विरोधातील आंदोलनात सहभागी व्हायला नकार दिला. आंदोलनात सहभागी होऊन दुकानं बंद ठेवली तर घर कसं चालवायचं असा प्रश्न कापड व्यापार्‍यांनी आंदोलक व्यापार्‍यांना विचारला. यावर दोन्ही व्यापार्‍यांच्या गटामध्ये बाचाबाची झाली आणि हाणामारीही झाली. सिताबर्डी पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र कापड व्यापार्‍यांनी दुकानं सुरू ठेवल्यामुळे व्यापार्‍यांच्या बंदचा फज्जा उडवलाय.

close