‘यूपीएससी’च्या परीक्षेत मराठीचा झेंडा

May 3, 2013 1:54 PM0 commentsViews: 29

03 मे

केंद्रीय लोक सेवा आयोग अर्थात युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आणि या परीक्षेत यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. हरिता व्ही कुमार देशात पहिली आली आहे. तर महाराष्ट्राचा मयूर दीक्षित 11 वा तर कौस्तुभ दिवेगावकर देशात 15 वा आला आहे.

क्षिप्रा आग्रे देशात 29 वी तर रवी पट्टनशेट्टी 47 वा आणि मृण्मयी जोशी 95 वी आली आहे. आजच्या या निकालात 998 विद्यार्थ्यानी यश मिळवले आहे. यात महाराष्ट्रातील 80 विद्यार्थी आहे. या सर्व विद्यार्थ्यांची आयएएस, आयपीएस, आयएफस आणि केंद्र सरकारच्या इतर महत्त्वाच्या विविध खात्यांसाठी निवड झाली आहे.

'यूपीएससी'विरांशी बातचीत

close