10 वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

January 2, 2009 7:34 AM0 commentsViews: 5

2 जानेवारी, मुंबई 10 वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 12वीची परीक्षा 26 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. 12वीची प्रॅक्टीकल, तोंडी आणि श्रेणी परीक्षा 6 ते 24 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. तर लेखी परीक्षा 26 फेब्रुवरी ते 21 मार्च दरम्यान होणार आहे. 10वीची प्रॅक्टीकल, तोंडी आणि श्रेणी परीक्षा 12 ते 28 फेब्रुवरी तर लेखी परीक्षा 5 ते 23 मार्च दरम्यान होणार आहे. मार्च 2009 मध्ये होणारी ही परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. तर जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे.

close