लाचखोर अधिकार्‍यांना 10 मे पर्यंत पोलीस कोठडी

May 3, 2013 4:13 PM0 commentsViews: 17

03 मेनाशिक : भ्रष्टाचाराचा कळस गाठणार्‍या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. लाचखोर अधिकारी सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ या दोघांनाही दहा मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांच्या न्घरांतून आणि बँकांच्या दोन लॉकर्समधून कोट्यवधींची रोकड आणि सोनं सापडलं आहे. चिखलीकर यांच्या राज्यात 26 ठिकाणी मालमत्ता असल्याचं उघड झालंय. अद्याप त्यांच्या इतर मालमत्तेचा तपास सुरू आहे.

लाचखोर अधिकार्‍यांनी बेनामी संपत्तीवर

- कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांची मालमत्तारोकड – 7 कोटी 46 लाखसोने, चांदी – 4 किलो 50 तोळेमालमत्ता – कल्याण, ठाणे येथे दोन बिअरबार, एक पेट्रोलपंप, औरंगाबाद, लातूर, जालना, मुंबई येथे मालमत्ता

शाखा अभियंता जगदिश वाघ यांची मालमत्तारोकड – 47 लाखसोने – 1 किलो मालमत्ता – नाशिकमध्ये दोन फ्लॅट आणि धुळ्यात फ्लॅट

close