अनिल अंबानी फोर्ब्स यादीतले बिगेस्ट लूजर्स

January 2, 2009 2:30 AM0 commentsViews: 4

2 जानेवारी, मुंबई पैसा फारकाळ टिकत नाही असं म्हणतात. अनिल अंबानी यांच्या बाबतीतही असचं काहीसं झालं आहे. त्यांच्याकडे 42 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे..पण आर्थिक मंदीचा फटका अनिल अंबानी यांच्या संपत्तीलाही बसला आहे. गेल्या वर्षात या छोट्या अंबानींना बारा अब्ज कोटी डॉलर्सचं नुकसान सहन करावं लागलं आहे. फोर्ब्स मासिकांनं जाहीर केलेल्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत अनिल अंबानी यांचा नंबर सहावा आहे. पण आताच्या फोर्ब्सच्या यादीनुसार ते वर्षभरातले बिगेस्ट लूजर्स ठरलेत. फोर्ब्सनं मार्चमध्येच जगातल्या श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली होती. मंदीचा फटका या सर्व श्रीमंत लोकांच्या संपत्तीवर पडला आहे. वर्षभरात अंदाजे एक अब्ज कोटी डॉलर्सचं नुकसान या बड्या लोकांना सहन करावं लागलंय.

close