कोलकाताचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय

May 3, 2013 5:46 PM0 commentsViews: 6

02 मे

कोलकाता नाईट रायडर्सची गाडी अखेर पुन्हा विजयाच्या रुळावर परतलीय. आज झालेल्या लढतीत कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट राखून पराभव केला. गतविजेत्या कोलकाताला यंदाच्या हंगामात सूर गवसला नव्हता. 10 पैकी 7 मॅचमध्ये कोलकाताला पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे स्पर्धेतलं आव्हान कायम राखण्यासाठी कोलकाताला आजच्या मॅचमध्ये विजय गरजेचा होता. कोलकाताच्या खेळाडूंनीही आज दमदार कामगिरी केली. राजस्थानच्या प्रमुख बॅट्समनना झटपट आऊट करत कोलकाताच्या बॉलर्सनं राजस्थानला 132 रन्समध्ये रोखलं. तर बॅट्समननं विजयाचं हे माफक आव्हान 17 ओव्हरमध्ये पार करत टीमला शानदार विजय मिळवून दिला. जॅक कॅलिस आणि युसुफ पठाणनं फटकेबाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

close