संत्री उत्पादकांना तुटपुंजी मदत

January 2, 2009 6:32 AM0 commentsViews: 43

2 जानेवारी 2008 नागपूरविदर्भातील नुकसान झालेल्या संत्री उत्पादक शेतक-यांना अधिवेशानाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली. एका झाडामागे 125रुपये आणि हेक्टरी 10 हजार रुपयांची ही मदत आहे. प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत काहीच नसल्यानं केवळ नावापुरत्या केलेल्या या मदतीनं शेतकरी नाराज आहेत. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातल्या संत्री उत्पादक कृष्णराव रोडे, यांच्या बागेतील संत्र्याचं मोठं नुकसान झालं. काही झाडांची संत्री लहान असतांनाच खाली गळाल्यामुळे वर्षभराची मेहनत वाया गेली. आता सरकारनं नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत जाहीर केली. पण ही तुटपुंजी मदत या शेतक-यांना मंजूर नाही.यंदा पाऊस कमी झाल्यामुळे संत्र्याच्या बागा सुकल्या. आणि जिथे विहरीला पाणी होतं त्या ठिकाणी 12 तासांच्या लोडशेडिंगने राहिलेल्या बागा सुकल्या. नागपूरला संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हटलं जातं पण इथे कधी पाण्याच्या कमतरतेमुळे तर कधी कोळशी किंवा डिक्या रोगामुळे संत्री उत्पादक संकटात सापडला आहे. 33 हजार 988 शेतक-यांना याचा फटका बसला.राज्य सरकानं अशा शेतक-यांना 56 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.यात प्रति झाड 125 रूपये मदतीचा समावेश आहे. पण एका झाडाच्या नुकसानाच्या तुलनेत ही मदत तुटपुंजी आहे.

close