ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा -मुंडे

May 4, 2013 10:14 AM0 commentsViews: 37

04 मे

नवी दिल्ली : ओबीसींची जनगणना करावी या मुद्द्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीने दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी संमेलन झालं. यावेळी ओबीसींसाठी राज्यात आणि केंद्रात स्वतंत्र मंत्रालय असावे अशी मागणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. या संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, सुधाकर गणगणे, यासारखे नेते एकत्र आले होते. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा ओबीसी कार्ड खेळलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

close