चॅम्पियन्स ट्रॉफीतून गंभीर-युवराज आऊट

May 4, 2013 10:33 AM0 commentsViews: 17

04 मे

इंग्लंडमध्ये होणार्‍या आयसीसी चॅम्पियनस ट्रॉफीसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 जणांची टीम जाहीर झाली आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जवळपास दोन तास झालेल्या बैठकीनंतर 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. टीममधून धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंग आणि ओपनर गौतम गंभीर यांना डच्चू देण्यात आला.

गेल्या वर्षभरात युवराज आणि गंभीरला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही, त्यातच सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतही हो दोन्ही प्लेअर खराब फॉर्ममध्ये आहेत. याशिवाय मुंबईकर अजिंक्य रहाणेलाही टीममधून वगळण्यात आलंय. त्यांच्याऐवजी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे, शिखर धवन, दिनेश कार्तिक, इरफान पठाण आणि फास्ट बॉलर विनय कुमारला संधी देण्यात आली.

टीममध्ये आश्चर्यकारक निवड ठरलीय ती स्पीन बॉलर मुरली कार्तिकची… तब्बल 2 वर्षांनी मुरली कार्तिकनं भारतीय टीममध्ये पुनरागमन केलंय. तर यापूर्वीच 30 जणांच्या संभाव्य यादीतून वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंगला डच्चू देण्यात आला आहे. आयपीएल संपल्यानंतर इंग्लंडमध्ये 6 जून ते 23 जून दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी खेळवली जाणार आहे.

अशी आहे टीम

महेंद्रसिंग धोणी(कर्णधार), विराट कोहली, रविंद्र जाडेजा, सुरेश रैना, आर. आश्विन, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, इरफान पठाण, दिनेश कार्तिक, उमेश यादव, अमित मिश्रा,रोहित शर्मा,मुरली विजय, ईशांत शर्मा, विनय कुमार

close