जायकवाडीच्या पाण्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

May 4, 2013 3:29 PM0 commentsViews: 16

04 मे

मनमाड : जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आता मनमाडच्या नगराध्यक्षांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याआधी अहमदनगर मधील नगरपालिकांनी सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती.

सध्या मनमाडमध्ये 15 ते 20 दिवसांनी पाणी येतंय. त्यात करंजवण धरणातून पाणी सोडलं तर मनमाडकरांच्या पाण्याच्या टंचाईत अधिकच भर पडेल. म्हणून मनमाडचे नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी नाशिककरांच्या वतीनं ही याचिका दाखल केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून तात्काळ पाणी सोडावे असे आदेश दिले होते. खंडपीठाच्या या आदेश विरोधात राज्य सरकारनेही फेरविचार याचिका दाखल केली होती मात्र खंडपीठाने निर्णय कायम ठेवत पाणी सोडावेच असे आदेश दिले होते.

close