एफबीआयने दिली कसाबच्या गावाला भेट

January 2, 2009 7:51 AM0 commentsViews: 6

2 जानेवारी 2009मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाब याच्या पाकिस्तानमधल्या फरीदकोट गावाला अमेरिकेच्या एफबीआयच्या पथकानं भेट दिली. लष्कर ए तोयबाचे कमांडर झकी उर रहमान लख्वी आणि झरार शाह याला भारताच्या ताब्यात द्यावं, अशी सूचना अमेरिकेने पाकिस्तानला यापूर्वीच केली आहे. मुंबई हल्ल्यातले अतिरेकी आणि लष्कराचे हे दोन कमांडर यांच्यात झालेलं फोन संभाषण एफबीआयनं रेकॉर्ड केलं आहे. झरार शहानं मुबंई हल्ल्याची कबुली दिल्याचं पाकिस्तानातल्या पंतप्रधान कार्यालयातल्या सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याशी फोनवरून बातचीत केली. पाकिस्तान आपल्या जमिनीचा वापर अतिरेकी कारवायांसाठी करू देणार नाही, असं आश्वासन त्यांनी बुश यांना दिलं.

close