हैदराबादची दिल्लीवर 6 विकेटने मात

May 4, 2013 5:54 PM0 commentsViews: 12

03 मे

आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात सलग सात पराभवांचा रेकॉर्ड करणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड जमा झाला. दिल्लीनं यंदाच्या हंगामातल्या लोएस्ट स्कोरची नोंद तर केलीच शिवाय स्पर्धेतला आठवा पराभवही ओढवून घेतला.

सनरायजर्स हैदराबादने दिल्लीवर 6 विकेट आणि 6 ओव्हर राखून मात केली. या विषयाबरोबरच हैदराबादनं पॉइंटटेबलमध्येही तिसरं स्थान पटकावलंय. टॉस जिंकून दिल्लीने पहिली बॅटिंग घेतली. पण त्यांचा हा निर्णय सपशेल फसला. हैदराबादच्या भेदक बॉलिंगसमोर दिल्लीची टीम अवघ्या 80 रन्सवर ऑलआऊट झाली.

डेल स्टेन, थिसारा परेरा आणि डेरेन सॅमी या फास्ट बॉलर्सनं दिल्लीला दणका दिला. विजयाचं हे आव्हान पार करताना हैदराबादलाही चार विकेट झटपट गमवावे लागले. पण डेरेन सॅमी आणि हनुमा विहारीनं नॉटआऊट पार्टनरशिप करत चौदाव्या ओव्हरमध्ये 81 रन्स करत विजय मिळवला.

close