मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची अतिरेक्यांची धमकी

May 6, 2013 9:43 AM0 commentsViews: 14

06 मे

अजमल कसाब, अफजल गुरूच्या फाशीनंतर दहशतवादी संघटनेनं डोकंवर काढलं आहे. मुंबई, कोलकाता आणि हैदराबादवर 21 जुलै रोजी दहशतवादी हल्ला करण्याची धमकी पत्र अल जिहाद या नव्या दहशतवादी संघटनेनं पाठवलं आहे. नौदलाच्या वेस्टर्न कमांड मुख्यालयाला अल जिहादनं हे पत्र पाठवलंय.

मुंबई आणि कोलकात्यातल्या अमेरिकनं वकिलतीवरही हल्ला करू असंही या पत्रात म्हटलं आहे. तसंच 26/11 च्या हल्ल्याप्रमाणे मुंबई, हैदराबाद, कोलकता इथल्या रेल्वे स्टेशन्स आणि इतर गर्दीच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची धमकीही अल जिहादने दिली.

भारताच्या सर्व सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी या धमकीची गंभीर दखल घेतं देशाभरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. नौदलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, इंडियन मुजाहिद्दीनकडूनही हल्ले होण्याची शक्यता असल्याचा अलर्ट एटीएसनं जारी केला.

close