दुसरं इकॉनॉमी बूस्टर पॅकेज जाहीर होणार

January 2, 2009 8:46 AM0 commentsViews: 1

2 जानेवारी 2009 मंदावलेल्या आर्थिक प्रगतीला चालना मिळावी म्हणून लवकरच दुसरं इकॉनॉमी बूस्टर पॅकेज येणार आहे. या पॅकेजला पंतप्रधानांनी अंतिम मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत हे पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी 5 डिसेंबरला सरकारनं पहिलं बूस्टर पॅकेज जाहीर केलं होतं. या बूस्टर पॅकेजमुळे देशातील उद्योगक्षेत्रांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.