दुष्काळाचा फटका, दूध महागणार ?

May 6, 2013 10:51 AM0 commentsViews: 10

06 मे

मुंबई : दूधाच्या दरांमध्ये घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. म्हशीच्या दुधाचे दर प्रति लिटर तब्बल सहा रुपयांनी तर गाईचं दूध चार रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेता दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून घेण्यात येणार्‍या दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय राज्य सहकारी दूध संघ कृती समितीनं घेतला आहे. रविवारी या संदर्भात समितीची बैठक पार पडली. येत्या दोन ते तीन दिवसांत शासनाशी चर्चा करुन निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचं समितीचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी सांगितलं.

close