एलबीटी विरोधात व्यापार्‍यांचा पुन्हा बेमुदत बंद

May 6, 2013 11:59 AM0 commentsViews: 19

06 मे

मुंबई : एलबीटी विरोधात मुंबईतल्या व्यापार्‍यांनी आजपासून पुन्हा बेमुदत बंद पुकारला आहे. व्यापार्‍यांनी मरिन लाईन जवळ तीव्र निदर्शनं केली. रिटेल आणि किरकोळ व्यापारी संपात सहभागी झाले आहेत. मुंबईतील काही व्यापार्‍यांनी मानवी साखळी करुन धरणं आंदोलन केलं.

नाना चौकातल्या व्यापार्‍यांनी गिरगाव चौपाटीपर्यंत येऊन निदर्शनं केली. परवानगी न घेता मोर्चा काढल्यानं पोलिसांनी या मोर्चाला अडवलं. यावेळी व्यापारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. तसंच होलसेल व्यापार्‍यांनी बंद पुकारला असला तरी रिटेल व्यापार्‍यांनी मात्र दुकानं सुरुच ठेवली आहेत.

तर दुसरीकडे, एलबीटीचा तिढा सुटत नसल्याने त्यात काही सवलत देता येईल का यावर राज्य सरकार विचार करत आहे. यासाठी पाच जणांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एलबीटीवर ठाम असले तरी त्याबाबतीत सौम्य भूमिका घ्यावी, यासाठी पक्षातूनच त्यांच्यावर दबाव वाढतोय.

close