बनावट पासपोर्ट प्रकरणात हसन अलीला जामीन मंजूर

January 2, 2009 9:55 AM0 commentsViews: 4

2 जानेवारी 2009 मुंबईहसन अलीला बनावट पासपोर्ट प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.पुणे येथील व्यापारी हसन अलीवर अवैध मालमत्ता जमवल्याचा आरोप ठेऊन त्याला सेंट्रल एन्फोर्समेंट डायरेक्टरने नोटीस पाठवली होती. त्यानंतर त्याला पुण्यातून कटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर हसन अलीला मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावर मुंबईतल्या शिवडीच्या सेशन कोर्टात त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याबाबतचा निर्णय देताना कोर्टाने हसन अलीला 1 लाख रुपयाचा जामीन मंजूर केला आहे. याशिवाय कोर्टाच्या प्रत्येक सुनावणीच्यावेळी त्याला हजर राहणे. तसंच तपास कामात सहकार्य करणे ह्या अटीही घालण्यात आल्या आहेत.जामीन मंजुरीबाबतच्या ऑर्डर मिळाल्यानंतर त्याची मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका होईल. हसन अली अनिवासी भारतीय आहे. त्याच्याकडे अनेक बनावट पासपोर्ट सापडले होते. तसेच त्यांची परदेशात अनेक ठिकाणी बँक खाती आहेत. त्याच्यावर हवालामार्गाने पैशाचे गैरव्यवहार केल्याचाही आरोप ठेवण्यात आले आहेत.अनधिकृत हवाला व्यवहार ते घोड्यांचा व्यापार, आणि बनावट पासपोर्टस ते करोडो रुपयांची टॅक्सचोरी अशी ओळख आहे पुण्यातला बिझनेस टायकून हसन अली यांची. हसन अलीनं 36 हजार कोटींची अवैध मालमत्ता जमवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. याच मालमत्तेवरचा कर बुडवल्याबद्दल इन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं ही नोटीस बजावली होती.

close