सुरेश जैनांवर आरोपपत्र दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

May 6, 2013 2:13 PM0 commentsViews: 17

06 मे

जळगाव: घरकुल घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना धक्का बसलाय. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज चौथ्यांदा नाकारला आहे. 15 मे पर्यंत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तब्येतीचं कारण देऊन ते गेल्या 14 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. जळगावमधल्या 59 कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळा प्रकरणात ते मुख्य आरोपी आहेत. सुरेश जैन हे शिवसेनेचे जळगावचे आमदार आहेत.

काय आहे घरकुल योजना ?

- 110 कोटींची महत्त्वाकांक्षी योजना- गरीबांना हक्काचं घर देण्यासाठी योजना- 11,424 घरांची योजना- 1997मध्ये 9 ठिकाणी राबवले प्रकल्प- 7,500 घरांचं वाटप- उर्वरित घरांचं बांधकाम अपूर्ण

सुरेश जैन यांचा या घोटाळ्याशी काय संबंध ?- बेकायदेशीरपणे खान्देश बिल्डरला दिली ऍडव्हान्स रक्कम- सुरेश जैन यांच्या अधिपत्याखालच्या नगरपालिकेनं दिला ऍडव्हान्स- खान्देश बिल्डरचं ऑफिसही सुरेश जैन यांच्या घरात- थोडक्यात, पैसे देणारे आणि घेणारेही जैन यांचे निकटवर्तीय- घोटाळा झाला तेव्हा सुरेश जैन होते राष्ट्रवादीत

close