किरकोळ वादातून तरूणाला पेटवले

May 6, 2013 4:16 PM0 commentsViews: 10

06 मे

नवी मुंबईत किरकोळ कारणावरून एका व्यक्तीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवल्याची खळबळजनक घटना घडलीय. याप्रकरणी सनी सोनावणे या तरूणाला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सनी सोनावणे हा महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती सुधाकर सोनावणे यांच्या पुतण्या आहे.

रबाळे परिसरात हळदीच्या कार्यक्रमातून गणेश कोठाल आणि सनी सोनावणे यांची आपापसात शाब्दिक बाचाबाची झाली. याचा राग मनात ठेवून रविवारी संध्याकाळच्या सुमारास सनीने गणेशच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवले. त्यात गणेश 90 टक्के भाजला होता. त्याला ऐरोलीच्या बर्न रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं सांगण्यात आलंय.

close