‘एमपीएससी’मुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या’

May 6, 2013 4:25 PM0 commentsViews: 73

06 मे

पुणे : येत्या 18 तारखेला होणार्‍या एमपीएसीच्या परीक्षेमुळे पुणे विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरु वासुदेव गाडे यांनी दिली. 18 तारखेला होणार्‍या सगळ्या परीक्षा नंतर घेतल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

एमपीएसीची परीक्षा 18 तारखेला घेतली जातेय. याचवेळी अनेक विद्यार्थ्यांच्या पदवीच्या परीक्षा होत्या. दोनही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार होतं. यावरच उपाय म्हणून विद्यापीठाने त्या दिवशी होणार्‍या सगळ्या परीक्षा पुढे ढकल्या आहेत. आता हे पेपर त्या त्या परिक्षांचे शेवटचे पेपर झाल्यानंतर त्याच्या दुसर्‍या दिवशी होतील अशी माहितीही गाडे यांनी दिली आहे.

तसंच प्राध्यापकांच्या संपाचा पुणे विद्यापीठाच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही आणि पुणे विद्यापीठांच्या सगळ्या परीक्षांचे निकाल वेळेवरच लागतील असंही गाडे यांनी स्पष्ट केलं. प्राध्यापकांच्या संपात फूट पडल्यामुळे आता अनेक प्राध्यापक काम करत आहेत. त्यामुळे पेपर तपासणीचं काम सुरळीत सुरु आहे. त्यामुळे निकालावर काहीही परिणाम होणार नाही असं कुलगुरुंनी स्पष्ट केलं आहे.

close