‘अहमदनगरचं पाणी जायकवाडीत सोडू नये’

May 7, 2013 10:21 AM0 commentsViews: 5

07 मे

दुष्काळग्रस्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडणं योग्य नाही कारण त्यामुळे खूप पाणी वाया जातं आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या 105 गावांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर ताण येतो, असं राज्य सरकारने म्हटलंय. मराठवाड्याला पाणी सोडू नये, अशी याचिका नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या नगर पालिकांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जायकवाडीच्या धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्यात यावे असे आदेश दिले होते. यासाठी निलवंडे धरणातून पाणीही सोडण्यात आलं मात्र नाशिक आणि नगरच्या शेतकर्‍यांनी याला विरोध दर्शवला आहे.

close