इंडियन मुजाहिदीनच्या 6 दहशतवाद्यांच्या कोठडीत वाढ

January 2, 2009 11:47 AM0 commentsViews: 1

2 जानेवारी 2009इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 6 दहशतवाद्यांच्या न्यायालयीन कोठडीत मोक्का कोर्टानं 12 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद इथं झालेले सीरियल बॉम्बस्फोट, तसंच सुरत इथं बॉम्ब ठेवण्याच्या घटनेच्यावेळी धमकीचे ई-मेल मुंबईतून गेले होते. त्याचा तपास करून मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत इंडियन मुजाहिदीनच्या 20जणांना अटक केली होती . हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यापैकी 6 जणांना विशेष मोक्का कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत मोक्का कोर्टानं 12 जानेवारीपर्यंत वाढ केली.दरम्यान इंडियन मुजाहिदीनच्या या दहशतवाद्यां ताब्यात देण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी केली आहे.

close