श्रीलंकेच्या फौजांनी किलीनोच्चीवर ताबा मिळवला

January 2, 2009 12:16 PM0 commentsViews: 13

2 जानेवारी 2009 गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेलं श्रीलंकेतलं युद्ध आता अंतिम टप्प्यात पोचलं आहे.श्रीलंकेच्या फौजांनी अखेर किलीनोच्चीवर ताबा मिळवला. लंकेच्या दृष्टीने किलीनोच्ची हे महत्त्वाचं ठिकाण आहे. कारण हे ठिकाण लिट्टेचं हेडक्वार्टर आहे. त्याच्यावर ताबा मिळवल्यानं आता लिट्टेच्या कारवायांना आळा बसणार आहे. पण त्यांच्या नक्की ठिकाणाबद्दल अजूनही कोणालाही कल्पना नाही. पूर्वेकडे तसचं जाफनामधून एलटीटीई आधीचं नेस्तनाबूत झालं आहे. एलटीटीई चीफ व्ही प्रभाकरनं किलीनोच्ची भागात कुठेतरी लपला असून तो तिथूनच आपले आदेश देत असण्याची शक्यता आहे. श्रीलंकचे आर्मी चीफ सरथ फोन्सेकाच्या यांच्यानुसार या वर्षाच्या अखेरपर्यंत लंकेची आर्मी किलीनोच्चीवर कब्जा करेल असं म्हटलं होतं. एलटीटीईच्या कारवाया रोखण्यासाठी किलीनोच्चीवर ताब्यात घेणं हे लंकेच्या दृष्टीने खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण किलीनोच्चीही गेल्या दशकापासून लिट्टेची राजकीय आणि प्रशासनिक राजधानी होती. आता लिट्टेची स्थिती बिकट झाली आहे. कारण लंकेचं लष्कर दक्षिण आणि पश्चिम या दोन्ही दिशांनी त्यांना घेरतंय. त्यामुळे तामिळी बंडखोर आता मुल्लैतिवूमधल्या वण्णी जंगलात ढकलले गेले आहेत.श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी सांगितलं, आमच्या सैन्यानं किलीनोच्चीवर संपूर्ण ताबा मिळवलाय हा विजय एका वंशाचा दुस-या वंशावर मिळवलेला नसूनअख्ख्या श्रीलंकेचा विजय आहे. लिट्टेच्या 'तमीलनेट' या वेबसाईटवर किलीनोच्चीतून माघार घेतल्याची कबुली देण्यात आली आहे.पण तामिळी बंडखोरांनी आपल्या पद्धतीने निषेधही नोंदवला आहे. राजधानी कोलंबोमध्ये वायुदलाच्या मुख्यालयासमोर झालेल्या एका आत्मघातकी स्फोटात 2 ठार तर 30 जखमी झाले. यावरून हे स्पष्ट होतं की लिट्टेची राजधानी पडली असली तरी ते शेवटच्या सैनिकापर्यंत आणि शेवटच्या फैरीपर्यंत लढणार आहेत

close