LBTचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा करू नये -उद्धव ठाकरे

May 8, 2013 12:17 PM0 commentsViews: 11

08 मे

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी एलबीटीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करु नये. एलबीटीवर समिती नेमण्याला आमचा विरोध नाही पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत जकात सुरु ठेवा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच व्यापार्‍यांच्या सोबत शिवसेना आहे पण व्यापार्‍यांनी दुकानं बदं ठेवून जनतेस वेठीस धरु नये असंही उद्धव ठाकरेंनी व्यापार्‍यांना सुनावलं. आज व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

एलबीटी विरोधात मुंबईतील व्यापार्‍यांनी दोन दिवसांपासून बेमुदत बंद पुकारला आहे. मंगळवारी व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरेंनी व्यापार्‍यांना चांगलंच खडसावलं. तुमचा लढा सरकारशी आहे. जनतेशी नाही. अगोदर दुकानं उघडा मग सरकारशी लढा असा सल्ला राज यांनी दिला. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आज व्यापार्‍यांनी थेट 'मातोश्री' गाठले. पण उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंची रेघ ओढत व्यापार्‍यांना सुनावले.

close