राणेंचा पुढचा प्लॅन 6 जानेवारीला समजणार

January 2, 2009 1:02 PM0 commentsViews: 4

2 जानेवारी 2009 मुंबईविनोद तळेकर नारायण राणे यांनी मुंबई घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण 6 जानेवारीला आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करणार असल्याचं असं सांगितलं आहे. तो निर्णय काय आहे. असा निर्णय आपण का आणि कोणत्या परिस्थितीत घेतला हे ही त्याचवेळी सांगेन असं ते पुढे म्हणाले. याआधी सांगितल्याप्रमाणेच 6 जानेवारीला दुपारी 3.00 वाजता आपण ही घोषणा करणार आहे असं त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं. या निर्णयाबाबत आपण आपल्या सर्व कार्यकर्त्याबरोबर बोललो आहोतच. तसंच अनेक राजकीय तज्ज्ञ, विश्लेषक, राजकीय नेते यांच्याशीही आपली बोलणी झाल्याचं त्यांनी सांगितलं.यावेळी त्यांनी प्रदेश काँगेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर टीका केली. जो माणूस स्वत:चा मतदार संघ सांभाळू शकत नाही तो माणूस माझं भविष्य काय ठरवणार असं त्यांनी म्हटलं. तसंच नागपूर अधिवेशनात सरकारने जाहीर केलेलं कर्जमाफीचे पैसे कोठून आणणार, त्यांची तरतूद कशी करणार? हाही प्रश्न उपस्थित केला. आपल्याशी कोणीही काँग्रेसी नेता मनधरणी करण्यासाठी आला नाही हे ही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच आपण काँगेसच्या नेत्याच्या संपर्कात आहोत ह्या बातम्या चुकीच्या आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं.काँग्रेस सोडणार का या प्रश्नांवर मात्र त्यांनी मौन बाळगलं. आता आगामी लोकसभा निवडणुका पाहता नारायण राणे कोणती भूमिका घेतात याकडेच सगळयाचं लक्ष लागलं आहे.

close