‘प्राध्यापकांनी संप मागे घेतल्याशिवाय थकबाकी नाहीच’

May 9, 2013 9:49 AM0 commentsViews: 34

09 मे

मुंबई : गेल्या 90 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला प्राध्यापकांचा संप आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. प्राध्यापकांच्या संघटना तडजोड करण्यास तयार नसल्यानं सरकारनं आता कडक भूमिका घेतली असून संप मागे घेतल्याशिवाय एक पैसाही देणार नसल्याची नवी भूमिका सरकारने घेतलीय.

तसंच अत्यावश्यक सेवा कायदा मेस्मा नुसार कारवाईचा इशाराही दिलाय. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली असून सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्राध्यापकांना संप मागे घ्या अशी ताकीद दिली आहे.

प्राध्यापकांच्या थकीत वेतनासाठी राज्य सरकारने 1,500 कोटी देण्याची तयारी दाखवली आहे. एप्रिल महिन्यात 500 कोटींचा पहिला हफ्ताही देण्यात आला आहे. तरी सुद्धा प्राध्यापकांच्या संघटनेनं संप मागे घेण्यास नकार दिला. सरकारने कारवाई करण्याचा इशारा देताच अनेक प्राध्यापकांनी संपातून बाहेर पडले. प्राध्यापकांच्या संपात मोठी फूट पडलीय.

close